इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागालँडचे पर्यटन व उच्च शिक्षा मंत्री तेमजेन इम्ना अलॅान्गने प्राथमिक शाळेतील एक व्हिडिओ शेअर केला असून तो सर्वत्र व्हायलर होत आहे. लहान मुलांना शिक्षण देतांना वेगवेगळ्या ट्रीक वापरल्या जातात. असाच एक ट्रीकचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
मंत्र्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मात्र थेट विद्यार्थ्यांना भाज्याचे नाव लक्षात रहावे यासाठी शाळेत सर्व मुलांना वेगवेगळ्या भाज्या दिल्या असून ते भाज्यांचे नाव सांगत आहे. खरंतर ही चांगली गोष्ट असली तरी रोज या भाज्या शाळेत आणणे शाळेला परवडेल का असा प्रश्नही काहींना पडला आहे. शेवटी काहीही असो या नव्या कल्पनेने मात्र विद्यार्थ्यांना सहज भाज्यांचे नाव लक्षात राहिल असेच आहे.
तेमजेन इम्ना अलॅान्गने हे नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव असतात. त्यांनी हा व्हिडिओ टाकतांना हर स्कूल में ऐसी शिक्षा व्यवस्था होनी चाहिए और हर शिक्षक ऐसा! असे म्हटले आहे. तर बघा हा व्हिडिओ…