नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांच्या विकास आणि देखभालीसाठी जबाबदार आहे. आपल्या विस्तृत रस्ते आणि रेल्वेच्या जाळ्याची देखभाल आणि विस्तार करण्यासाठी देशासमोर येणाऱ्या विविध आव्हानांवर सरकार सक्रियपणे तोडगा शोधत आहे. त्यानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे 940% पेक्षा अधिक वाढवण्यात आली असून 2009-14 या कालावधीत दरवर्षाला 25,872 कोटी रुपयांची तरतूद होती, आता या कामासाठी 2023-24 या कालावधीत 2,70,435 कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
हाय स्पीड कॉरिडॉरसह 4 किंवा अधिक मार्गिका असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याची लांबी मार्च, 2014 मध्ये असलेल्या सुमारे 18,371 किलोमीटर पेक्षा 250% नी अधिक वाढून आतापर्यंत सुमारे 46,179 किलोमीटर एवढी झाली आहे. तसेच, 2 पेक्षा कमी मार्गिका असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी मार्च 2014 मध्ये सुमारे 27,517 किलोमीटर वरून सुमारे 14,870 किलोमीटर पर्यंत कमी झाली आहे. हे प्रमाण आता राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याच्या फक्त 10% आहे.
रेल्वेच्या जाळ्याच्या विस्ताराच्या संदर्भात सांगायचे झाले तर, भारतीय रेल्वेवरील नवीन लाईन, गेज रूपांतरण आणि दुहेरीकरण प्रकल्पांसाठी सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद 480% पेक्षा जास्त पटीने वाढवण्यात आलेली आहे.बीएस -6 फेज-II या ‘इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स फ्युएल व्हेईकल (एफएफव्ही)’ चा आणखी एक नमुना पर्यायी इंधन सुविधा उपायासह प्रगतिपथावर आहे.