इंडिाया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : क्रिकेट, चित्रपट आणि राजकारण या क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या क्रिकेटमधील एक प्रसिद्ध खेळाडू यांच्या जीवनातील घडामोडींची चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शिखऱ धवनचा अखेर घटस्फोट झाला असून कोर्टाने शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. दिल्लीमधील पटियाला हाऊस येथील कौटुंबिक न्यायालयाने ही मंजुरी दिली. यावेळी न्यायालयाने मान्य केले की, पत्नी आयशाने ऑस्ट्रेलियात वास्तव्य करत शिखर धवनला आपल्या एकुत्या एक मुलापासून कित्येक वर्षं दूर ठेवत मानसिक त्रास दिला.
आरोप या आधारावर मान्य केले
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यापुर्वी श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळली आहे. त्यामुळे धवनच्या नेतृत्व कौशल्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारताच्या या सलामीवीराच्या वैयक्तिक आयुष्याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शिखर धवनने दोन मुलांच्या आईसोबत लग्न केला होते आणि धवनने पत्नीच्या पहिल्या पतीपासूनच्या दोन्ही मुलांना स्वतःचे नाव दिले आहे.
पत्नी आयशा किक बॉक्सर
शिखर धवन याची पत्नी आयशा मुखर्जी ही एक किक बॉक्सर आहे आणि आजही ती फिटनेसची भरपूर काळजी घेते. आयशाचे वडिल बंगाली असून आई ब्रिटिश आहे.त्यामुळे आयशाकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे. दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने क्रिकेटपटू शिखर धवनला त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाच्या अर्जात केलेले सर्व आरोप या आधारावर मान्य केले की पत्नी आयशा मुखर्जी स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली. आयशाने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.