मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगाव महानगर पालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील विशेषता भागवदारांच्या महत्वाच्या कागदपत्रांच्या फाईल थेट भंगार बाजारात बेवारस स्थिती सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.नागरीक समितीचे रामदास बोरसे यांना याची माहिती मिळताच त्यांनी थेट घटनास्थळी जात पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडीस आला.
या घटनेची सिटी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेत सर्व फाईल्स ताब्यात घेतल्या. त्यानंतर पंचनामा केला. महापालिकेच्या या महत्वपूर्ण फायली कोणी कशा बेवारस ठिकाणी ठाकल्या याचा आता पोलिस शोध घेत आहे.
महापालिकेत झालेल्या गैरव्यवहार लपविण्याचा कोणी प्रयत्न केला, या फाईल बाहेर कशा गेल्या याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत असून नकुतेच नव्याने रुजू झालेले पालिका आयुक्त जाधव यांनीही या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्ष्ट केले आहे.