इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वादळी वा-यामुळे झाडे उन्मळून पडली, घरांचे पत्र उडाले हे आपण नेहमीच बघतो. पण, एखादे विमानच गरा गरा फिरल्याचे कधीच दिसले नाही. पण, अर्जेंटिनामध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे हे विमान हवेत नव्हते तर ते रनवेवर असतांना ते फिरलं व सर्वांनाच धक्का बसला. वादळी वा-याचा वेग इतका होता की भले मोठे विमानही त्याच्यासमोर टिकू शकले नाही.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. अर्जेंटिना आणि ऊरुग्वेमध्ये भीषण वादळ आल्याच्या घटनेत ही घटना लक्षवेधी ठरली आहे. या वादाळात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे मोठी वित्तहानी होऊन जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
या वादळात किती ताकद होती. ते मात्र या विमानाच्या दृष्यावरुन दिसून येते. या वादळात रनवेवर विमान फिरल्याची ही घटना १७ डिसेंबर रोजी घडली. ब्युन आयर्स जॅार्ज न्यूबेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्क केलेले हे विमान होते. वादळ आल्यानंतर ते गरा गरा फिरत असतांनाच विमानात चढण्या – उतरण्यासाठी ज्या शिडीचा वापर केला जातो त्याचेही नुकसान त्याने केले. या ठिकाणी जिवितहानी झाली नसली तरी या विमानाच्या या जमीनीवरील सरळ घिरट्या मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेले.