नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपघाताची मालिका सर्वत्र सुरुच आहे. पण, नाशिकमध्ये सातपुर येथे नंदिनी नदी पुलावरुन मध्यरात्री एक कार पुलावरुन थेट नंदिनी नदी पात्रात पडल्याची घटना घडली आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. रात्री ही घटना घडल्यामुळे कोणाला काही कळाले नाही. सकाळी मात्र ही घटना समोर आली.
सातपूर मळे परीसरातील दादोबा पुलावरून होंडा कंपनीची आय- २० गाडी थेट नंदीनी नदी पात्रात पडली. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. एमएच १५ एचवाय ७५७६ ही कार ही कार मळे परीसरातून येत असतांना नंदीनी नंदीवरील दादोजी जाधव या पुलावर आली. त्यावेळेस चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट नंदीनी नदी पात्रात पडली.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही कार नदी पात्रात गाडी पडल्याचे कळाल्यानंतर नागरीकांनी एकच गर्दी केली. सातपूर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत चालकांचा शोध घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.