इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पूर्ववैमनस्यातून रागातून अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात एका कुटुंबांतील सहा जणांना कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिघांना जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. ही धडक दिल्यानंतर कारचालक फरार झाला. ह कारचालक याच गावातील नाचोना गावातलाच असून त्याचा अवैध दारूचा व्यवसाय असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर मृतांचे नातेवाईक जमा झाले. त्यानंतर हा कारचालक पुन्हा आला व त्याने तीन जणांच्या अंगावर गाडी घातली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. धक्कादायक म्हणजे कार चालकान अनेकदा पुढे-मागे कार हा हल्ला केला.
अशा पध्दतीने एखाद्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करण्याचा हा प्रकार गंभीर असून त्यामुळे अख्खा अमरावतील जिल्हा हादरला आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान गंभीर जखमी असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. चंदन गुजर असे आरोपीचे नाव आहे.