इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अचानक दिल्लीला जाण्यामागे आणखी एक कारण पुढे आले असून त्यात महामंडळाच्या जागांचा पेच आहे. पालकमंत्री पदाचा तिढा काही अंशी सुटला असला तरी महायुतीत असलेल्या तीन्ही पक्षांमध्ये महामंडळाच्या वाटपावरुन मात्र रस्सीखेच आहे. यात भाजपने दिलेला फॅार्म्युला शिंदे गटाला मान्य नसल्याचे बोलले जात आहे. तर अजित पवार गटाचे शिंदे गटाला ज्या जागा द्याल त्याच जागा राष्ट्रवादीला द्या असे म्हणणे आहे.
महामंडळाच्या वाटपाबाबत भाजपने १००-२५ -२५ असा फॅार्म्युला दिला आहे. तर शिंदे गटाला ४०-३०-३० असा हवा आहे. त्यामुळे हा पेच अद्याप सुटलेला नाही. काल राज्याच्या पालकमंत्रीपदाची नवीन यादी जाहीर केली. त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नऊ पालकमंत्रीपद देण्याचे निश्चित झालेले असतांना ७ जागांवरच समाधान मानावे लागले. पुणे येथील पालकंत्रीपद अजित पवार यांना देण्यात आले असले तरी रायगड नाशिक येथे मात्र रस्सीखेच सुरु आहे. या ठिकाणी शिंदे गटाने विरोध केला आहे. त्यामुळे महायुतीचे घोडं अडलं आहे. त्यामुळेच अजित पवार नाराज आहे.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट समोर आली होती. त्यानंतर शिंदे व फडणवीस थेट दिल्लीत गेले. त्यानंतर पालकमंत्री पदाची यादी सायंकाळी जाहीर झाली. पण, या यादीत पवार अद्याप समाधानी नाही. महायुतीचे तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे अंतर्गत धुसफुस सुरु असल्याची अजूनही अनेक कारणे आहे. पण, ती अजून तरी पुढे आली नाही. पण, आता यातील दोन कारण पुढे आले असून त्यात गेल्या काही दिवसापासून चर्चा होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती दर्शनाला सर्व नेते गेले. पण, अजित पवार गेले नाही. त्यानंतर दोन्ही नेते ओबीसी बैठकीत एकत्र दिसले. त्यानंतर अजून एका रात्री झालेल्या बैठकीत हे नेते होते. यावेळेस पालकमंत्रीपदाची व महामंडळाच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे…