नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास संघर्षाविषयीच्या ताज्या घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
दोन्ही नेत्यांनी सागरी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मानवतावादी मदत सुरु ठेवण्याच्या गरजेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरूच्चार केला. संघर्ष लवकर संपुष्टात यावा आणि या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने चर्चेने, मुत्सद्देगिरीने तोडगा काढण्यात यावा तसेच सर्व ओलिसांची मुक्तता करण्यात यावी, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला.
उभय नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याविषयी सहमती व्यक्त केली.