इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नोकरी करणा-या महिलांशी कसे वागायला हवे हे काही अधिकारी यांना कळत नाही. ब-याच वेळा ते त्यांच्याशी उध्दट वागतात. तर काही जण थेट त्यांच्याकडे जवळीक साधत त्यांचा गैरफायदा घेतात. असाच प्रकार बिहारमध्ये घडला असून त्यामुळे थेट डीएसीपी असलेल्या अधिका-याचे निलंबन झाले आहे. या डीएसीपीने थेट महिला उप निरिक्षकाला ठाणे प्रमुख बनवतो असे सांगत थेट शारिरिक संबधाची मागणी केली. त्यासाठी त्याने अश्लिल मेसेजही या माहिला अधिका-याला पाठवले. पण, हे सर्व प्रकरण त्याच्या चांगलेच अंगलट आले.
डीएसपी फैज अहमद खान याने महिला निरीक्षकांना सांगितले की, माझ्यासोबत मी तुन्हाला पोलीस ठाणे प्रमुख बनवतो.. पण, त्यासाठी त्यांनी अट टाकली. ती अटच त्यांना महागात पडली. बिहार पोलिसांमध्ये डीएसपी दर्जाचे पोलिस अधिकारी फैज अहमद खान कैमूर जिल्ह्यातील मोहनिया येथे एसडीपीओ होते. हेच एसडीपीओ आपल्या कनिष्ठ महिला निरीक्षकाला त्याच्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत होते व आमिष दाखवून त्याने शारीरिक संबंधांची मागणीही केली.
पण, या महिला उपनिरीक्षकाने धाडस दाखवले आणि कैमूरचे एसपी ललित मोहन शर्मा यांना पोलिस अधिकाऱ्याच्या कृतीची माहिती दिली. तक्रारीतच संरक्षणाची विनंती केली. एसपींनी एक तपास समिती स्थापन केली आणि समितीला महिला उपनिरीक्षकाचे आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यांनी अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. गृह विभागानेही तातडीने दखल घेत एसडीपीओला निलंबित करण्याची अधिसूचना जारी केली.