गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा…सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी दिली ही माहिती

by Gautam Sancheti
डिसेंबर 19, 2023 | 11:37 pm
in राज्य
0
IMG 20231219 WA0318 1 e1703009230886

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल,असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते. मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने त्या जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाची तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेकाच्यावेळी काढलेले होन स्मृती म्हणून आरबीआयकडून काढत आहोत. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावं, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या काळात औरंगजेबालाही महाराष्ट्र जिंकता आले नाही. त्यांच्या अशा अलौकिक कार्यामुळे काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल. या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो,असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने मंत्री श्री.मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यसभा सभापती वैयक्तिकरित्या दुखावले…नेमकं घडलं काय

Next Post

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचे टीझर रिलीज (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 146

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचे टीझर रिलीज (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

daru 1

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तिघांनी रिक्षाचालकास जीवे मारण्याचा केला प्रयत्न…भगूर येथील घटना

ऑगस्ट 7, 2025
crime1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखाची रोकड केली लंपास…जेलरोड भागातील घटना

ऑगस्ट 7, 2025
Untitled 9

निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक कशी चोरली? राहुल गांधीचा गंभीर आरोप

ऑगस्ट 7, 2025
Untitled 6

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा…

ऑगस्ट 7, 2025
modi 111

भारता विरुद्ध अमेरिकेचे टेरिफ वॉर….पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता दिले प्रत्त्युत्तर….

ऑगस्ट 7, 2025
Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011