इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
२४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण दिले नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना बोलत होते. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षण देणार पण त्यासाठी कोणते निकष लावणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं नाही असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ते स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. त्यानंतर जरांगे पाटील याची प्रतिक्रिया समोर आली आहे.