नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लेखक, कवी जगदीश देवरे यांची खास मुलाखत इंडिया दर्पणच्या वंदना वेदपाठक यांनी घेतली आहे. बालकथा, कविता, क्रीडा, चित्रपट अशी विविध विषयांवरील लेख देवरे यांनी लिहले आहे. तब्बल ३५ वर्षाहून अधिक काळ त्यांचे लिखाण विविध वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेले आहे.
काही महिन्यापूर्वी त्यांचा चुतीलले निखारे हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्राहाचा प्रकाश सोहळाही लक्षवेधी ठरला होता. सर्वसाधारणपणे काव्यसंग्रहाचे प्रकाशन तर होतच असते. पण, या काव्यसंग्रहाचे प्रकाशन खास होते. हा कार्यक्रम साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. या प्रकाशन सोहळ्यात संगीतकार-गायक संजय गीते यांनी कवी देवरे यांच्या निवडक रचनांवर आधारित ‘शब्द-सूर संवाद’ हा छोटेखानी कार्यक्रम सादर केला. तो सर्वांना मंत्रमुग्ध करुन गेला.
कवी देवरे यांचे क्रीडा विषयक लिखाणही भरपुर आहे. त्यांचे प्रसिध्द फुटबॅालपटूवर एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यानंतर बरीच पुस्तके येत्या काही दिवसात त्यांची प्रकाशित होणार आहे. त्यांचा हा सर्व प्रवास आज मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत…