नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळल्यामुळे राज्यातील शेतकरी संतप्त आहे. त्यामुळे ठिकठिकाणी या निर्णयाविरुध्द आंदोलन होत आहे. पण, एका शेतक-यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट फुकट फुकट..फुकट…६४ पिशव्या फुकट…आम्ही नालायक शेतकरी….१०३ रुपये खर्च आणण्याचे २०० रुपये गेले असे सांगत आपला संताप व्यक्त केला. या कांदा उत्पादक शेतक-यांच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे.
हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्यातला हा व्हिडिओ आहे माहित नाही, पण राज्यातील शेतक-याचं हे वास्तव आहे. ‘हमीभाव’ तर सोडाच पण त्यांच्या ‘मेहनतीचा पैसा’ही मिळत नाहीए. ‘बळीराजा’च्या नावाने मोठमोठ्या घोषणा करायच्या पण योजना त्यांच्यापर्यंत पोहचतच नसल्याने भ्रष्ट व्यवस्थेत शेतक-यांचाच ‘बळी’ जातोय. इथे कुणी शेतकरी बंधू-भगिनी असतील तर तुमची मतं इथे जरूर नोंदवा.तुमच्यावतीने आम्ही सरकारला जाब विचारू. असे म्हटले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी विविध आंदोलन करीत आहे. पण, या शेतक-याचा हा संताप लक्ष वेधणारा आहे. त्यामुळे सरकार याची किती दखल घेतो हे महत्त्वाचे आहे.