नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात ७५ वर्षीय वृध्दासह २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना जयभवानी रोड भागात घडली. चांदनी पिंटू सिंग (२२ रा.जाचकनगर) या विवाहीतेने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. भाऊ सचिन राय यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.
दुस-या घटनेत गणेशवाडीतील भगवान बन्सी अक्कर – कासार (७५ रा.हरिकृपा पार्क अमरधामरोड) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मेव्हणे भगवान कासार यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.