इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीपूर्वी २०२४ च्या पूर्वांचलमध्ये बहुजन समाज पक्षाला मोठा फटका बसू शकतो. उत्तर प्रदेशातील जौनपूरचे बसप खासदार श्याम सिंह यादव काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शकतात आहे. त्यांनी नुकतीच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली.
श्याम सिंह यादव यांनी दहा जनपथवर राहुल गांधी यांची भेट घेतली. यादव संसद भवनातूनच गेले. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. गेल्या वर्षी २०२२ मध्ये यादव हे काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेलाही गेले होते आणि तिथे त्यांनी राहुल यांची भेट घेतली होती. यादव यांनी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्याबद्दल भाष्य केले होते. ही यात्रा समरसता आणि विकासासाठी असून तिचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले होते. राहुल यांनी बसप खासदार श्याम सिंह यादव ‘भारत जोडो’ यात्रेला आले, तेव्हा त्यांना पत्रही लिहिले होते.
भाजपमध्ये प्रवेश करण्याचीही चर्चा होती. यापूर्वी श्याम सिंह यादव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प आणि उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले होते.