इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, अमोल कोल्हे, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. या खासदारांना निलंबीत करण्यात आले. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील निलंबित खासदारांची संख्या १४१ झाली आहे.
लोकसभेत गदारोळ केल्यानंतर आतापर्यंत निलंबित केलेल्या खासदारांनी संसद भवन व गांधी पुतळ्यासमोर सकाळी आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारवरही टीका करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी इतिहासातील ही पहिली घटना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निलंबीत केले आहे. लोकशाहीच्या विरोधात ही कृती असल्याचे सांगितले आहे.
काल काँग्रेसचे अधीर रंजनसह ३४ खासदार निलंबित करण्यात आले. याअगोदर १४ खासदारांचे निलंबन झाले होते. त्यामुळे आता हा आकडा ४७ झाला होता. आता राज्यसभेतही ३४ खासदार निलंबित करण्यात आल्यामुळे एकाच दिवसात निलंबित खासदारांची संख्या ६७ झाली तर आतापर्यंतची संख्या १४१ झाली आहे. आजही काही खासदारांचे निलंबित करण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे.
राज्यसभेमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुगम, नसीर हुसेन, फुलोदेवी नेताम, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरुल इस्लाम, रणजीत रंजन, कनिमोझी, फैयाज अमजद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे, वंदना चव्हाण, रामगोपाल योदव, जावेद अली खान, जोसे मनसे, जोशी. महुआ मांझी आणि अजित कुमार यांना निलंबित केले आहे. तर लोकसभेत निलंबन केलेल्या खासदारांमध्ये टी. सुमति, कल्याण बनर्जी, ए. राजा, दयानिधी मारन, अपारुपा पोद्दार, प्रसून बनर्जी, ईटी मोहम्मद, जी. सेल्वम, सीएन अन्नादुरई, अधीर नंजन चौधरी, असीत कुमार मला.कौशलेंद्र कुमार, एंटो एंटनी, एसएस पलानीमनिकम, अब्दुल खालिक, थिरुनावुक्कारासर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के. मुरलीधरन, सुनील मंडल, एस. रामालिंगम, के. सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगाई, टीआर बालू, के कानी नवास, के. वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॅाय, शताब्दी रॅाय, के. जयकुमार यांची नावे आहे.