नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेत गदारोळ केल्यानंतर आतापर्यंत ९२ खासदार निलंबित केलेल्या खासदारांनी संसद भवन व गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारवरही टीका करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांनी इतिहासातील ही पहिली घटना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निलंबीत केले आहे. लोकशाहीच्या विरोधात ही कृती असल्याचे सांगितले आहे.
काल काँग्रेसचे अधीर रंजनसह ३४ खासदार निलंबित करण्यात आले. याअगोदर १४ खासदारांचे निलंबन झाले होते. त्यामुळे आता हा आकडा ४७ झाला होता. आता राज्यसभेतही ३४ खासदार निलंबित करण्यात आल्यामुळे एकाच दिवसात निलंबित खासदारांची संख्या ६७ झाली तर आतापर्यंतची संख्या ९२ झाली आहे.
राज्यसभेमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुगम, नसीर हुसेन, फुलोदेवी नेताम, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरुल इस्लाम, रणजीत रंजन, कनिमोझी, फैयाज अमजद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे, वंदना चव्हाण, रामगोपाल योदव, जावेद अली खान, जोसे मनसे, जोशी. महुआ मांझी आणि अजित कुमार यांना निलंबित केले आहे. तर लोकसभेत निलंबन केलेल्या खासदारांमध्ये टी. सुमति, कल्याण बनर्जी, ए. राजा, दयानिधी मारन, अपारुपा पोद्दार, प्रसून बनर्जी, ईटी मोहम्मद, जी. सेल्वम, सीएन अन्नादुरई, अधीर नंजन चौधरी, असीत कुमार मला.कौशलेंद्र कुमार, एंटो एंटनी, एसएस पलानीमनिकम, अब्दुल खालिक, थिरुनावुक्कारासर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के. मुरलीधरन, सुनील मंडल, एस. रामालिंगम, के. सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगाई, टीआर बालू, के कानी नवास, के. वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॅाय, शताब्दी रॅाय, के. जयकुमार यांची नावे आहे.
लोकसभेत ३३ पैकी ३० खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. तर के. जयकुमार, विजय वसंत व अब्दुल खालिक यांचे निलंबन विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत असणार आहे. या तीन्ही खासदारांवर स्पीकरच्या पोडियमवर चढून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. या अगोदर १४ डिसेंबरला १४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेची सुरक्षा भेदत केलेल्या घुसखोरीच्या प्रकरणावर विरोधकांनी या अधिवेशनात सरकारला धारेवर धरत गोंधळ घातला. त्यामुळे सरकारने ही मोठी कारवाई केली.
या कारवाईबाबत राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल म्हणाले की, हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतील ३४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ११ खासदारांचे प्रकरण संदर्भित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीकडे. एकूण ४५ राज्यसभा खासदारांना आज निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सभागृह सुरळीत चालवायचे नव्हते, ही त्यांची पूर्वनियोजित रणनीती होती.