इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. पण, या यादीत सर्वात मोठा धक्का भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांना बसला. त्यांचे पुण्याचे पालकमंत्रीपद काढून ते अजित पवार यांना देण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा असतांना त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास ते एक तास होते. या भेटीबाबत मात्र नंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने त्यासंबधी माहिती देण्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले. पण, ही भेट पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेतल्यानंतरची होती.
चंद्रकांतदादा यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पण, ते समाधानी नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद गेल्यापासून चंद्रकांत पाटील यांचे भाजपमधील राजकीय वजन कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. त्याचाच भाग म्हणून त्यांचे पुणे येथील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले. अजित पवार यांच्याबरोबर त्यांचा वाद नवा नाही. त्यामुळे त्यांनी विरोध करणे समजण्यासारखे आहे. पण, देवेंद्र फडवणीस यांनी चंद्रकांत पाटील यांची साथ दिली नाही. त्यामुळे त्यांना हे पुणे पालकमंत्रीपद गमवावे लागले. चंद्रकांत दादा पाटील हे पुणे येथील कोथरुड विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या जिल्हयातील पालकमंत्रीपद हे महत्त्वाचे असतांना त्यांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली.
खरं तर हा काटा अजित पवार यांना काढला की देवेंद्र फडणवीस यांनी काढला याबाबत आता राजकीय चर्चा रंगू लागली असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदात पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील, अमरावती- चंद्रकांत दादा पाटील, भंडारा- विजयकुमार गावित, बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम, बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे, नंदूरबार- अनिल भा. पाटील, वर्धा – सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. पण,यात चंद्रकांतदादा पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.