इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे, त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे, शिंदेसेनेच्या शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर, काँग्रेस नेते रणजित देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे उद्योगपती पद्माकर मुळे, बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांना वेगवेगळ्या कारणाखाली नोटिसा बजावल्या असून, १२ तारखेला पीएमपीए न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मनी लाँड्रिंग व पैशाच्या अफरातफरीप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून २६ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. ‘ईडी’ने या प्रकरणात तपासाला सुरुवात केली. तनपुरे यांनी राम गणेश गडकरी २६ कोटींचा कारखाना, ११० एकर जमीन अवघ्या १२ कोटीत घेतला. तनपुरे यांचा वांबोरी येथे प्रसाद शुगर हा खासगी साखर कारखाना आहे. बंद पडलेला गडकरी साखर कारखाना तनपुरे यांनी राज्य सहकारी बँकेकडून खरेदी केला होता. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने या लिलावास मंजुरी दिली होती.
खोतकर यांचे मित्र जुगलकिशोर तापडिया यांनी कारखान्यासाठी ४२.३१ कोटींची, अजित सीडस्च्या पद्माकर मुळे यांच्या कंपनीने २१ कोटींची तर मुळे व खोतकर भागीदार असलेल्या अर्जुन शुगर इंडस्ट्रीजनेही निविदा भरली होती; मात्र ‘ईएमडी’शिवाय असलेली तिसरी निविदा रद्द झाली. तापडिया यांच्या कंपनीचा ४२ कोटींत लिलाव मंजूर झाला. जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याची शंभर कोटींची जागा खोतकर यांनी लाटल्याचा आरोप आहे.