इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाले आहे. काल अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीबाबत घोषणा केल्या. त्यानंतर इतर विषयांवरही त्यांनी सरकारची भूमिका सांगीतली. विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर आज विधिमंडळाचे अधिवेशन सकाळी सुरु झाले.
अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर आता आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन चर्चा होणार आहे. शिंदे समितीने अहवाल दिल्यानंतर आज तो सभागृहात ठेवला जाणार आहे. त्यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विविध प्रश्न मांडले जात आहे. विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर विधिमंडळात चर्चा सुध्दा केली. त्यानंतर सरकारने त्याला उत्तर दिले. या अधिवेशनात नऊ विधेयक मांडले गेले. दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात विविध मोर्चे सुध्दा निघाले. त्याला सरकार सामोरे गेले. अधिवेशान सुरु होण्याअगोदरच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत आपला रोख नक्की केला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट विरोधकांनी सत्ताधारी गटावर टीका करत कोणकोणत्या मुद्दे उपस्थितीत करणार असल्याचे सांगितले होते. या सर्व घडामोडींचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी काल त्याला उत्तर दिले. आज ते काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
या अधिवेशनात मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे विषय केंद्रस्थानी आहे. त्याचप्रमाणे ड्रग्ज प्रकरण, आरोग्य विभागही रडारवर आहे. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण तूम्ही युट्युबवर बघा.