इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारमध्ये मद्यबंदी असतांना दारु पिऊन झिंगाट होणारे प्रकरण नवे नाही. चोरी करुन दारुची नशा येथे केली जाते. त्यावर टीकाही होते. पण, तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही. पण, आता एका दारुच्या पार्टीवरुन येथील राजकारण चांगलेच तापले आहे. ही दारुची पार्टी आहे. बिहारमधील डॅाक्टरांची.
दारुची पार्टी करणारे हे डॅाक्टर दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (DMCH) आहे. त्याच्या या पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये ते दारुची पार्टी करतांना दिसत आहे. या पार्टीवरुन पोलिसांनी कारवाई केली असली तरी येथील राजकारण मात्र या पार्टीमुळे चांगलेच तापले आहे.
या दारुच्या पार्टीने भाजपसह विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जापचे प्रमुख पप्पू यादव यांनी, या प्रकाराने बिहारमधील मद्यबंदीची पोलखोल झाल्याचे म्हटले आहे. डीएमसीएचचे प्राचार्य व डॉक्टरांसाठी मद्यबंदीचा वेगळा कायदा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.