ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सोमवारी चंपाषष्ठीपासून प्रारंभ झाला. मार्गशीष प्रतिपदेपासून म्हणजेच पाच दिवस अगोदर घटना स्थापना करण्यात आली होती. दररोज रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली.
दुपारी दोन वाजेपासून बारा गाड्यांची वाद्यांच्या गजरात तब्बल सहा तास मिरवणूक काढण्यात आली व गोरज मुहूर्तावर एका आश्वाने परंपरेप्रमाणे बारा गाड्या ओढण्यात आल्या. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजन यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
तसेच ओझर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत ठेवण्यात आलेल्या नियोजनामुळे यावेळीचा यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणावर नियोजन दिसून आले. तसेच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यामार्फत ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तात यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला आहे.