मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली या प्रकल्पांना भेट…

by Gautam Sancheti
डिसेंबर 18, 2023 | 7:03 pm
in राज्य
0
unnamed 2023 12 18T190126.187 e1702906360506

चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी या शेतीविषयक विकसनशिल प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या क्षेत्रीय दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत, नागपूरचे संचालक (आत्मा) दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, नोडल अधिकारी (स्मार्ट) प्रज्ञा गोळघाटे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रीती हिरळकर, नोडल अधिकारी (स्मार्ट) नंदकुमार घोडमारे, उपविभागीय कृषी अधिकारी तथा वरोराचे तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, भद्रावतीच्या तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी वरोरा तालुक्यातील मौजा कोंढाळा येथील कापूस उत्पादक शेतकरी विकास धेंगळे व भानुदास बोधाने यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकाच्या लागवडीचे वेळापत्रक व अर्थशास्त्र या दोन्ही बाबींवर चर्चा केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घेत कृषी विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल करण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर वरोरा तालुक्यातील मौजा एकार्जुना येथील उत्कृष्ट कापूस प्रकल्पास भेट दिली. या भेटीदरम्यान एकार्जुना संशोधन केंद्रात आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी बिटी व नॉनबिटी कापसाच्या विविध प्रात्यक्षिकाबाबत माहिती दिली. यावेळी सेंद्रिय कापूस लागवड तंत्रज्ञान, ट्रायकोकार्ड वापर व कामगंध सापळ्यांचा वापराबाबत चर्चा करण्यात आली. कापसाचे उत्पादन 30 ते 35 टक्के वाढीसाठी तसेच ठिंबक सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत डॉ. गेडाम यांनी कृषी विभागास सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान डॉ. गेडाम यांनी जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, चिनोरा (ता. वरोरा) येथे भेट देऊन तेथील स्मार्ट प्रकल्पातंर्गत जिनिंग प्रेसिंग युनिटची पाहणी केली तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी शेती निगडीत विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा केली.

स्मार्ट प्रकल्पातंर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी केंद्राची उभारणी प्रकल्पास भेट दिली. पीएमएफएमई (PMFME) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सुनील उमरे यांच्या तेलघाणी युनिटचे उद्धाटन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या शेतावरील सेंद्रीय ऊस उत्पादन व सेंद्रीय गूळ निर्मिती केंद्रास भेट देण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या जिल्ह्यात २७ नवीन रूग्णवाहिका दाखल होणार; पालकमंत्र्यांनी दिली परवाणगी

Next Post

‘अवकाळी’मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
unnamed 2023 12 18T194707.908 e1702909107509

‘अवकाळी’मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

ताज्या बातम्या

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्यात या पाच अधिका-यांच्या बदल्या…नाशिक झेडपीच्या सीईओपदी या अधिका-याची नियुक्ती

ऑगस्ट 5, 2025
Screenshot 20250805 190544 WhatsApp 1

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा

ऑगस्ट 5, 2025
IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011