इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाले आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असून अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीबाबत ते माहिती देत आहे. त्याचप्रमाणे इतर विषयांवरही त्यांनी सरकारची भूमिका सांगीतली. विरोधकांच्या टीकेलाही ते उत्तर देत आहे.
या अधिवेशनात विविध प्रश्न मांडले जात आहे. विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर विधिमंडळात चर्चा सुध्दा केली. त्यानंतर सरकारने त्याला उत्तर दिले. या अधिवेशनात नऊ विधेयक मांडले गेले. दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात विविध मोर्चे सुध्दा निघाले. त्याला सरकार सामोरे गेले. अधिवेशान सुरु होण्याअगोदरच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत आपला रोख नक्की केला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट विरोधकांनी सत्ताधारी गटावर टीका करत कोणकोणत्या मुद्दे उपस्थितीत करणार असल्याचे सांगितले होते. या सर्व घडामोडींचा आढावा मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात घेत आहे.
या अधिवेशनात मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे विषय केंद्रस्थानी आहे. त्याचप्रमाणे ड्रग्ज प्रकरण, आरोग्य विभागही रडारवर आहे. या सर्वांवर मुख्यमंत्री बोलत आहे थेट प्रक्षेपण तूम्ही युट्युबवर बघा.