नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेत गदारोळ केल्यामुळे काँग्रेसचे अधीर रंजन सह ३३ खासदार निलंबित करण्यात आले. याअगोदर १४ खासदारांचे निलंबन झाले आहे. त्यामुळे आता हा आकडा ४७ झाला आहे. ३३ पैकी ३० खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. तर के. जयकुमार, विजय वसंत व अब्दुल खालिक यांचे निलंबन विशेषाधिकार समितीचा रिपोर्ट येईपर्यंत असणार आहे. या तीन्ही खासदारांवर स्पीकरच्या पोडियमवर चढून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे.
निलंबन केलेल्या खासदारांमध्ये टी. सुमति, कल्याण बनर्जी, ए. राजा, दयानिधी मारन, अपारुपा पोद्दार, प्रसून बनर्जी, ईटी मोहम्मद, जी. सेल्वम, सीएन अन्नादुरई, अधीर नंजन चौधरी, असीत कुमार मला.कौशलेंद्र कुमार, एंटो एंटनी, एसएस पलानीमनिकम, अब्दुल खालिक, थिरुनावुक्कारासर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के. मुरलीधरन, सुनील मंडल, एस. रामालिंगम, के. सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगाई, टीआर बालू, के कानी नवास, के. वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॅाय, शताब्दी रॅाय, के. जयकुमार यांची नावे आहे.
या अगोदर १४ डिसेंबरला १४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेची सुरक्षा भेदत केलेल्या घुसखोरीच्या प्रकरणावर विरोधकांनी या अधिवेशनात सरकारला धारेवर धरत गोंधळ घातला. त्यामुळे सरकारने ही मोठी कारवाई केली.