मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील नागरी सेवा समितीतर्फे विविध मागण्यांसाठी लोटांगण घालत अनोखे आंदोलन करण्यात आले. वाढीव घरपट्टी रद्द करावी, पार्किंग व्यवस्था झाली पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
महात्मा गांधी पुतळ्या पासून ते महापालिकेपर्यंत नागरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोटांगण घालत तेथे जाऊन पोहचले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. लोटांगण घालून समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
एखाद्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा या प्रकाराची आता महानगरपालिका कशी दखल घेते हे महत्त्वाचे आहे.