नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात घरफोडीची मालिका सुरुच असून एका घटनेत घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐेवज चोरुन नेला. सरदार चौकातील सदगुरूनगर भागात ही घरफोडी झाली. यात चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश बाबुराव सदगुरू (रा.सदगुरू सदन,मुठेलेन) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदगुरू कुटुंबिय १४ ते १६ डिसेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोने चांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख २४ हजार रूपये किमतीचे ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गावित करीत आहेत.
रोकडसह मोबाईल चोरल्याची दुसरी घटना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सदिच्छानगर भागात घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. खिडकीतून हात घालून चोरट्यांनी दरवाजास लावलेली आतील कडी उघडून ही चोरी केली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनवासी दिनानाथ विश्वकर्मा (रा.देवराम आव्हाड यांची चाळ,सदिच्छानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विश्वकर्मा कुटुंबिय गुरूवारी (दि.७) रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून हात घालून दरवाजाची आतून लावलेली कडी उघडली. त्यानंतर घरात प्रवेश करून हॉलमधील कपाटातील रोकड व टेबलावर पडलेला मोबाईल असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.