नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा टाकत १ लाख ६ हजाराचा साठा जप्त केला. सिडकोतील अंबड लिंक रोडवर हा छापा टाकण्यात आला. रविवारी अन्न औषध प्रशासनाचे पथक साडेसहा कार्यालयास गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अन्न औषध प्रशसनाच्या पथकाने अशोक जीतलाल यादव, मे. तिस्ता क्रोप केअर प्रा. लि., मोरे मळा, लक्ष्मण टाउनशिप, अंबड लिंक रोड, सिडको, नाशिक या उत्पादक पेढीची /कारखान्याची तपासणी केली. तेथे रिफाईन्ड पोमोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) चा वापर करुन पनीर अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथून पनीर, रिफाईन्ड पोमोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) व मिक्स मिल्क या अन्नपदार्थाचे अन्नमुने घेवून पनीरचा १९४ किलो; किंमत रु.४६,५६०/-, रिफाईन्ड पोमोलिन ऑईलचा ८८ किलो, किंमत रु.१४,९६०/-, व मिक्स मिल्कचा १४९८ लिटर, किंमत रु. ४४,९४०/- असा एकुण किंमत रु.१,०६,४६०/- किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर हा पनीर, व मिक्स मिल्काचा साठा नष्ट करण्यात आला. तर रिफाईन्ड पोमोलिन ऑईल चा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
या कारवाईतील चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई घेण्यात येईल असे अधिका-यांनी सांगितले. सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो.सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यो.रो.देशमुख, गोपाल कासार, नमुना सहायक विजय पगारे यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग), सं.भा.नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.