नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील चांदवड, निफाड, मनमाड परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे कांदा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले होते, काल वडनेर-भैरव येथे प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांची कांदा-द्राक्ष परिषद झाल्यावर मुक्कामी थांबलेल्या कडू यांनी चांदवड तालुक्यातील तळेगाव, वडगाव पंगू येथे आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली.
अवकाळी पावासने जिल्ह्यातील कांदा, द्राक्षेसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट दिली. या पावसानंतर पंचनामे सुध्दा झाले. आता सर्वांचे लक्ष सरकार काय घोषणा करणार लागले आहे.
आज विधिमंडळाच्या अधिवेशनात मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच बच्चू कडू यांनी चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर पोहचले. त्यानंतर त्यांनी येथे शेतक-यांशी संवाद साधला.