लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यात बंदी विरोधात लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहे. आज संतप्त शेतकऱ्यांनी केले कांदा लिलाव बंद करत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी ही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा यासाठी लासलगाव बाजार समिती शेतक-यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज कांद्याला जास्तीतजास्त २३०४ रुपये, सरासरी २१०० रुपये तर कमीतकमी ८०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर पुन्हा आता शेतकरी आक्रमक झाले आहे.