नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालास दहा दिवस मुदतवाढ दिल्यानंतर आजपासून पुढील तीन दिवस अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. आता ही सुनावणी दिलेल्या मुदतीत पूर्ण होते की पुन्हा मुदतवाढ मागितली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आपर्यंत झालेल्या सुनावणीत शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांची उलट तपासणी संपली आहे. त्यानंतर लेखी युक्तीवाद देण्यात आला. आता दोन्ही गटांचे वकील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बाजू मांडणार आहेत. नार्वेकर यांच्यासमोर तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाला प्रत्येकी दीड दिवस युक्तीवादासाठी देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत, तर शिंदे गटाकडून अॅड. महेश जेठमलानी युक्तिवाद करीत आहेत. वीस तारखेला अंतिम युक्तिवाद होऊन दहा जानेवारीपर्यंत निकाल लागू शकेल असे बोलले जात आहे.