इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कराचीः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष दिल्याचा दावा केला जात आहे. ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, त्याची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र दाऊदला विषबाधा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
दाऊद ज्या रुग्णालयात दाखल आहे, तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या त्या मजल्यावर दाऊद हा एकमेव रुग्ण आहे. केवळ उच्च रुग्णालयातील अधिकारी आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना प्रवेश देत आहेत. दाऊदला पाकिस्तानात विष दिल्याच्या बातम्या आल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याची बातमी आहे.
लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही सर्व्हर डाउन आहेत. याशिवाय एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामदेखील काम करत नाहीत. रात्री ८ नंतर इंटरनेटचा वेग मंदावला आहे. नेटब्लॉक या जगभरातील इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि डिजिटल गव्हर्नन्सवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी पुष्टी केली आहे.
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी म्हणाल्या, “दाऊद इब्राहिमला कोणीतरी विष पाजले आणि त्यानंतर त्याची तब्येत बिघडली, असे ऐकू येत आहे. त्याची प्रकृती खूपच बिघडली आहे, त्याला कराचीतील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.