सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अमळनेर येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; असे आहे कार्यक्रम

by Gautam Sancheti
डिसेंबर 17, 2023 | 8:22 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20231216 WA0220 1


अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर (जि. जळगांव) येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली. या संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलन आदि कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनीप्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलनपूर्व कार्यक्रम म्हणून बालमेळावा आयोजित केला आहे. यात बालनाट्य तसेच साने गुरुजींच्या जीवनावर आधारित नाट्य प्रवेश-नाट्यछटा, गाणी सादर होतील.

दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलानाची सुरुवात सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर स.१०.३० वा. उद्घाटन समारंभा आधी ध्वजारोहण व ग्रंथ दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. दु.२ वा. बालसाहित्य संमेलनातील निवडक कार्यक्रमाचे सादारीकरण होईल. दु.३.३० वा. मुख्य सभागृहात होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे, राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय संध्याकाळी ५.३० वा. कविसंमेलन होईल. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सभागृहात दु. २.३० वा. कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक या विषयावर परिसंवाद होईल. दु. ३.३० वा. शासकीय परिसंवाद सादर होईल. संध्या. ५ वा. स्थानिक वक्ते स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयावर भाषण करणार आहेत.

दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी संमेलनाची सुरुवात स.९ वा. गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीने होईल. मुख्य मंडपात स. ११ वा. आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का? आणि दु.१२ वा. अलक्षित साने गुरुजी या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. यांत साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दु.२ वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे ‘आंतरभारती काल-आज-उद्या.’ दु.२ वा. आठवणीतल्या कविता-रसास्वाद नंतर संध्या. ६ वा. कविसंमेलन-२ होणार आहे. रात्री ८.३० वा. स्थानिक लोकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सभागृह २ मध्ये स.१० वा. चैत्राम पवार यांची मुलाखत नंतर दु.११ वा. मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे या विषयावर परिसंवाद होईल. दु. १२.३० वा. स्थानिक बोलीभाषेवर कार्यक्रम सादर करतील. दु. १.३० वा. कथाकथन. दु. ४ वा. कळ्यांचे निःश्वास परीचर्चेचा कार्यक्रम सादर होईल. संध्या. ६ वा. स्थानिक लोकांचा अभिवाचनाचा कार्यक्रम होईल.

दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी स.९ वा. श्री. बाबा साहेब सौदागर यांची मुलाखत. नंतर स.१०.३० वा अभिरूप न्यायालय यांत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज नाहीत या विषयावर चर्चा होईल. दु.१२ वा. परिसंवादः मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल आयोजित केला आहे. दु.३ वा. लेखिका मीना प्रभू आणि प्रकाशक चंद्रकांत लाखे यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. दुसऱ्या मंडपात स.९.३० वा. होणाऱ्या परिसंवादाचा विषय आहे वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य. स. ११ वा. साहित्यिकांचे शताब्दी स्मरण मध्ये शाहीर साबळे, जी.ए. कुलकर्णी, के.ज. पुरोहित-शांताराम, श्री. पु. भागवत, विद्याधर गोखले, विद्याधर पुंडलिक, इ. साहित्यिकांचे स्मरण करण्यात येईल. दु. २ वा. भारतीय तत्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. तसेच दोन दिवस कवी कट्टा, एक दिवस गझल कट्टा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा:* https://forms.gle/TCSFvFzRQNYhThNB7

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या… या प्रकरणात गुन्हा दाखल

Next Post

मुंबई- आग्रा महामार्ग लगत शिरवाडे – वडनेर भैरव रोडवर दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्या..तीन जण जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

आजपासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप…त्यानंतर या तारखेपासून पुन्हा पाऊस

सप्टेंबर 8, 2025
541656183 1104530571863252 1386343450728100575 n
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये १६ तास चालली विसर्जन मिरवणूक….२ लाख २६ हजार १७७ मूर्तीचे संकलन

सप्टेंबर 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जाणून घ्या, सोमवार, ८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1
महत्त्वाच्या बातम्या

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सप्टेंबर 7, 2025
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1
महत्त्वाच्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

सप्टेंबर 7, 2025
GANESH VISRJAN 4 1024x682 1
मुख्य बातमी

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

सप्टेंबर 7, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 7, 2025
Next Post
IMG 20231217 WA0323 e1702825522138

मुंबई- आग्रा महामार्ग लगत शिरवाडे - वडनेर भैरव रोडवर दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्या..तीन जण जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011