शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन…आता झाली इतर प्रवासी क्षमता

डिसेंबर 17, 2023 | 6:57 pm
in संमिश्र वार्ता
0
GBis93sb0AAPROs e1702819599778

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी नवीन टर्मिनल इमारतीची फिरून प्रत्यक्ष पाहणी देखील केली. सुरतमधील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी म्हणजे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कार्यातील महत्त्वपूर्ण झेप आहे. या अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवासाचा आनंद अनुभवतानाच यामुळे आर्थिक विकास, पर्यटन आणि दळणवळणालाही चालना मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

ही नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळी १२०० देशांतर्गत प्रवासी आणि ६०० आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वर्दळ हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. या इमारतीची महत्त्वाच्या गर्दीच्या वेळेची क्षमता ३००० प्रवाशांपर्यंत वाढवून वार्षिक हाताळणी क्षमता ५५ लाख प्रवाशांपर्यंत नेण्याची तरतूद आहे. ही नवी टर्मिनल बिल्डिंग, सुरत शहराचे प्रवेशद्वार असल्याने, इथली स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही इमारत निर्माण करण्यात आली आहे. इमारतीच्या आतील आणि बाहेरील बाजूला दोन्ही ठिकाणी येथील संस्कृती प्रतिबिंब व्हावी जेणेकरून अभ्यागतांमध्ये या स्थानाविषयी कुतुहलाची भावना निर्माण होईल याकडे लक्ष पुरवण्यात आले आहे.

सुरत शहराच्या रांदेर भागातील जुन्या वास्तूंप्रमाणे पारंपरिक आणि समृध्द लाकडी कलाकुसर केलेल्या दर्शनी भागापासूनच नवी सुधारित विमानतळ वास्तू प्रवाशांना संपन्न अनुभव देण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. ‘गृह-चार (GRIHA IV)’ अटींची पूर्तता करणारी नवी विमानतळ वास्तू विविध शाश्वत संतुलित वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये दुहेरी उष्णतारोधक छत, ऊर्जाबचत मंडप, कमीत कमी उष्णता शोषणारी दुहेरी चकचकीत आवरणाची एकके, पर्जन्यजलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे संयंत्र आणि सौर ऊर्जा निर्मिती- अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाचा भारतात नवा व्हेरिएंटमुळे एकाचा मृत्यू…जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

Next Post

केंद्र सराकर राज्यातून इतका मेट्रिक टन कांदा खरेदी करणार….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
kanda onion

केंद्र सराकर राज्यातून इतका मेट्रिक टन कांदा खरेदी करणार....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011