इंडिया दर्पण ऑनलाईन सेवा
मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला महागाई भत्ता राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आज त्यासंदर्भातील राज्य शासनाने एक पत्र परिवहन मंडळाला दिले आहे. राज्य शासनानने एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला ४२ टक्के महागाई भत्ता मंजूर केला आहे. त्यावर तात्काळ कार्यवाहीचे आदेशही देण्यात आले आहे. त्यामुळे पगारातच कर्मचाऱ्यांच्या खात्यात तो लवकरच जमा होणार आहे. सणासुदीच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे ८५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.