चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यात बंदी का केली असा प्रश्न करत विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावातून परत पाठवल्याची घटना चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथे घडली.
गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीवरुन नाशिक जिल्हयातील शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. या प्रश्नावरुन जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली. निर्यात बंदीची घोषणा केल्यानंतर कांद्याचे भावही कोसळले. त्यामुळे शेतक-यांमध्ये रोषण असून त्याचे पडसाद उर्धुळ येथे उमटले.
कांद्याची टंचाई नसताना केंद्र सरकारने निर्याबंदी का केली? पीक विम्याचे पैसे कधी मिळणार? असे विविध प्रश्न उपस्थित करत चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथील शेतकरी, ग्रामस्थांनी केंद्र सरकार विषयी रोष व्यक्त करत गावात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावातून परत पाठवला. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून रथ घेऊन येणाऱ्यांना नाईलाजास्तव परत जावे लागत आहे.