इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : स्फोटके आणि रसायने असलेल्या कारखान्यात स्फोट होऊन नऊ जण ठार झाले. नागपुरातील सोलार एक्सप्लोरी या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि रसायने असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
बाजार गाव येथे असलेल्या स्फोटकांच्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात इमारत उध्वस्त झाली. त्यात नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. काही इमारतीच्या आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. हा दारुगोळा लष्कराला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाला.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख तिथे पोचले आहेत.