मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांनी आज धारावीतून अदानी विरुध्द भव्य मोर्चा काढून भाजपला लक्ष्य केल्यानंतर भाजपने सुद्दा ठाकरे यांना प्रत्त्युतर दिले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना अदानींकडून पैसे मिळाले की, आपल्या भूमिकेशी यु टर्न घेतील, असा आरोप करत टीका केली. तर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत खळबळजनक आरोप केला.
कंबोज यांनी केलेल्या आरोपात म्हटले की, धारावी विकास, आता धारावीच्या नावाने अदानीकडून पैसे वसूलीची तयारी सुरु आहे. १० अब्ज रुपयांची वसूली करायची आहे. उद्धव यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचं आहे, ज्याचं डील काही दिवसांपूर्वी छोटे ठाकरेंनी केली आहे.
हे ट्विट हिंदीत असे आहे अब धारावी के नाम पे #Adani से वसूली की तैयारी चालू है ! 10000000000 /- की वसूली करनी है उद्धव जी को दुबई में होटल ख़रीदना हैं , जिसकी डील कुछ दिनों पहले की हैं छोटे ठाकरे साहब ने !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 16, 2023
ठाकरे यांनी अशी केली टीका
मोर्चात उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, आजचा मोर्चा अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा. ज्याने ज्याने अदानींची सुपारी घेतली आहे त्या सुपारीबाजांना सांगू इच्छितो हा अडकित्ता लक्षात घ्या. किती मोठा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, तुमची दलाली अशी ठेचून टाकू की, दलालीचं नाव घेणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी हे सरकार अदानींच्या दारी आहे. तुम्ही अदानींचे बूट चाटत आहात ते कशासाठी चाटत आहात?”असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.