नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुवेतचे अमीर महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे १६ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ, १७ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
या दिवशी संपूर्ण भारतात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर तो अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच, या दिवशी मनोरंजनाचे कोणतेही अधिकृत शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि जनतेप्रति संवेदना व्यक्त केली आहे.पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले: “महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त जाणून अतिशय दु:ख झाले. कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि तेथील जनतेप्रति मनापासून शोक भाव व्यक्त करतो.”