गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

स्वतःच करा स्वतःची ई- पीक पाहणी…. हे आहे स्वतंत्र ॲप

by Gautam Sancheti
डिसेंबर 16, 2023 | 8:46 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल विभागामार्फत शेतकरी व नागरिकांच्या मदतीने ई- पीक पाहणीची मोहीम सुरु करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वतः आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई- पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने सुरु केलेला आहे. यासाठी ई- पीक पाहणीचे स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेले असून त्या द्वारे शेतकऱ्यांनी सुलभतेने स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः करून स्वतच ई- पीकपाहणी करावी असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राहता तालुक्यातील रांजणखोल येथे शेतातील पीक पाहणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरु असून रब्बी हंगामाची ई- पीक पाहणी शेतकऱ्यांना करावयाची आहे. त्यासाठी प्लेस्टोअर वरून ई- पीक पाहणीचा नवीन व्हर्जन २ ॲप इन्स्टॉल करावे. त्यापूर्वी जुने एप्लीकेशन डीलेट करून घ्यावे लागेल. ई- पीक पाहणी करतांना आपले शेतातील पिकांची फळ झाडांची, विहीर अथवा बोअरवेलची नोंद करता येणार आहे. शासनाच्या पीक विमा व नुकसानीचे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई- पीक पाहणी असणे आवश्यक आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मौजे रांजणखोल येथील सौ. संगीता दिलीप ढोकचौळे यांचा गट नंबर १३६ मध्ये रब्बी पीक पाहणीची नोंद ई- पीक पाहणी ॲप मध्ये स्व हस्ते नोंद केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, सरपंच सौ. शुभांगी ढोकचौळे ,उपसरपंच चांगदेव ढोकचौळे, बाळासाहेब ढोकचौळे तसेच गावातील नागरीक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार, प्रतिष्ठित नागरिक व युवा यांनी शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभाग नोंदवावा. तसेच एका मोबाईलवर २०० खातेदारांची नोंद केली जाऊ शकते. म्हणून गावातील तंत्रस्नेही तरुणांनी ” ई- पीक पाहणी मित्र ” म्हणून पुढे यावे व ह्या योजनेला हातभार लावावा असे महसूल प्रशासनाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रला दुहेरी मुकुट….या राज्यातील संघाना मिळाले उपविजेतेपद

Next Post

मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह रिद्धपूरचा होणार सर्वांगिण विकास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
Next Post
unnamed 2023 12 16T211057.685 e1702741348793

मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह रिद्धपूरचा होणार सर्वांगिण विकास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011