नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खो-खो फेडरेशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे आयोजित ६७ व्या १९ वर्षे शालेय राष्ट्रीय स्पर्धेची आज यशस्वी सांगता झाली. दिनांक १२ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत मुले आणि मुलीं या दोन्हीही गटात महाराष्ट्राच्या खेळाडूनी अंतिम लढतीत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून विजय मिळवून दुहेरी मुकुट मिळविला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा खो – खो चे राष्ट्रीय खेळाडू तथा संघटक श्रीरंग इनामदार, नाशिकच्या न्यू ए्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा क्रीडा प्रेमी प्रकाश वैशंपायन, साईच्या प्रतिनिधी सुनीता राणी आणि सत्यपासी, रमेश भोसले, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, मुंबईच्या जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा शिंदे, प्रशिक्षक अजय पवार या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
तसेच या स्पर्धेत भारतात सर्वोत्तम अष्टपैल खेळाडू म्हणून मुलींमध्ये महाराष्ट्राची कर्णधार निशा वैजल (नाशिक) आणि मुलांमध्ये यांना तसेच या स्पर्धेतील आक्रमक खेळाडू म्हणून मुलांमध्ये. तर मुलींमध्ये सुहानी धोत्रे यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुलांच्या अंतिम सामना केरळ विरुद्ध झाला. या सामन्यात प्रथम आक्रमण करतांना महाराष्ट्राच्या संघाने केरळचे ११ खेळाडू बाद केले तर बचाव (संरक्षण) करतांना केवल दोन गडी गमावले. मध्यंतरला महाराष्ट्राने नऊ गुणांची आघाडी मिळविली. दुसऱ्या सत्रातही महाराष्ट्राच्या खेळाडूनी आक्रमक पवित्रा घेत केरळचे आठ गडी बाद करण्यात यश मिळविले. तर बचाव करतांना जोमाने खेळ करून नऊ मिनिटात केवल गडी गमावले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या संघाने केरळवर गुण आणि एक डाव राखून मुलांच्या गटाचे विजेतेपद आपल्या नांवे केले. महाराष्ट्राकडून खेळतांना रामचंद्र विलास, रमेश चेतन बीका यांनी उत्कृष्ट कामगीरी नोंदवली.
मुलींचा अंतिम सामना हरियाणा संघाविरूद्ध खेळविला गेला. या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलीनी सुरवातीपासूनच आप-आपसात चांगला समन्वय राखून आक्रमाममध्ये धार आणली आणि पहिल्या सत्रात हरियाणाच्या ११ खेळाडूंना बाद केले. तर बचाव करतांना महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या फक्त दोन गडी गमावले.मोठी आघाडी मिळविल्याने हरियाणाच्या खेळाडूंनी आपला पराभव मान्य केला. या अष्टपैलू खेळामुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने हरियाणावर ११-२ असा पराभव करून मुलींमध्येही महाराष्ट्राचा झेंडा मानाने फडकावला. या सामन्यात महाराष्ट्राची कर्णधार निशा वैजलने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले .करून संरक्षण केले. तर आक्रमानमध्ये गडी बाद करून महाराष्ट्राच्या विजयात मोलाची कामगिरी नोंदवली. तर वैष्णवी पोवार, अश्विनी शिंदे, सरिता दिवा, प्रणाली काळे, सुहानी धोत्रे, प्रतीक्षा बिरासदार यांनी रक्षण मुलांमध्ये केरळला तर मुलींमध्ये हरियाणा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुलींच्या आणि मुलांच्या दोन्हीही गटात तामिळनाडुने विजय मिळवला तिसरा क्रमांक मिळविला. खो-खो साठीच्या अधिकृत मॅट वर चार अद्ययावत क्रीडांगणाची संपूर्ण व्यवस्था जेष्ठ खो-खो संघटक मंदार देशमुख जिल्हा सचिव उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यांनी चोख पार पडली.
या स्पर्धेसाठी स्कूल गेम्स निरीक्षक म्हणून टि. के. मूर्ती आणि श्रीमती कनक यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेची तांत्रिक बाजू तांत्रिक समिति प्रमुख प्रेमानंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंच यांनी चोख पार पाडली. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी लाईव गुणफलक होते तर स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनलवर केले गेले.
या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, संदीप ढाकणे आणि इतर सहकारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
अंतिम निकाल :-
मुले – १) महाराष्ट्र – विजेता
२) केरळ – उपविजेता
३) तामिळनाडु – तिसरा क्रमांक
४) कर्नाटक – चवथा क्रमांक
मुली – १) महाराष्ट्र – विजेता
२) हरियाणा – उपविजेता
३) तामिळनाडु – तिसरा क्रमांक
४) पश्चिम बंगाल. – चवथा क्रमांक
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – मुली – निशा वैजल , मुले – विराज गळतणे. (दोघंही महाराष्ट्र )
उत्कृष्ठ आक्रमक खेळाडू :- मुले – चेतन बिका (महाराष्ट्र ) मुली – सुहानी धोत्रे ( महाराष्ट्र ) उत्कृष्ठ बचावपटू – मुली – अश्विनी शिंदे (महाराष्ट्र ), मुले – मेबीन फ्रान्सिस (केरळ)