नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख, यांच्या मार्गदर्शनाखाली नामको हॉस्पिटल वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत आहे त्याचाच प्रत्यय पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यातील एका कुटुंबाला आला.
दोन वर्षाची परी (बदललेले नाव) तिला वयाच्या सहाव्या महिन्यापासूनच पोटात दुखायचा त्रास सुरू झाला होता.. भरपूर दवाखाने झाले, अगदी उपचार करण्यासाठी त्यांना त्यांची जनावर विकावे लागले तरी देखील निदान काही होईना… याच पेशंटला नामको हॉस्पिटल येथील एक कर्मचारी पेठ मध्ये भेटले व त्यांनी हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांना दाखवून घ्या असे सुचवले..
हॉस्पिटलमध्ये डॉ. स्वप्नील पारख यांनी परीची तपासणी करून तिला पोटात मोठी गाठ आहे आणि ती शस्त्रक्रिया द्वारे काढावी लागेल असे सांगितले, परंतु पालकांकडे पैशाची काहीच तरतूद नव्हती, या परिस्थितीत हॉस्पिटलच्या सोशल वर्कर वैशाली गांगुर्डे आणि स्वाती डावरे यांनी या पेशंटसाठी चॅरिटी मधून निधी उपलब्ध केला आणि त्याद्वारे या पेशंटचे ऑपरेशन विनामूल्य करण्यात आले, परी च्या पोटातून साधारणता दोन किलो वजन (पंधरा सेंटीमीटर लांब) इतकी मोठी गाठ काढण्यात आली.. डॉ सतीश कापडणीस डॉ नागेश मदनुरकर भुलतज्ञ डॉ दिनेश बोरसे आणि डॉ स्वप्नील पारख यांच्या टीमने शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रिया पश्चात हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, नर्सिंग आणि सर्व फॅसिलिटी स्टाफने परीची खूप काळजीपूर्वक सेवा केली आणि त्यामुळेच परी आता तिचे पुढच्या आयुष्य निरोगी जगू शकेल याबद्दल परी च्या आई-वडिलांनी डॉक्टरांचे व विशेषतः सोशल वर्कर वैशाली गांगुर्डे आणि स्वाती डावरे यांचे निधी उपलब्ध करून मदत केल्याबद्दल विशेष आभार मानले.. नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सचिव शशिकांत पारख, मेडिकल सुपेरीटेंडंट डॉ विशाखा जहांगीरदार आणि जनरल मॅनेजर समीर तुळजापूरकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.