नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील सर्वसामान्य रुग्णांना लाभ होत आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरत अनेक अद्ययावत उपकरणे याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे सुपरस्पेशालिटीतील सर्व उपचार व शस्रक्रिया करणे शक्य झाले आहे. करुणा आणि सहानुभूती व उपचाराची अचूकता यामुळे लाखो रुग्णांची पावले आता एसएमबीटीकडे वळू लागली आहेत. तब्बल १२ सुपरस्पेशालिटी विभाग याठिकाणी कार्यान्वित करण्यात आले असून विविध शस्रक्रियांसाठी १७ सुसज्ज ऑपरेशन थियेटर्स उभारण्यात आले आहेत. यातील चार ऑपरेशन थियेटर्समध्ये पूर्णवेळ सुपरस्पेशालिटी विभागांतर्गत शस्रक्रिया केल्या जात आहेत. हे विभाग कार्यान्वित झाल्यामुळे अनेक क्लिष्ट शस्रक्रिया याठिकाणी होत आहेत. एकाच छताखाली २५ विभागांच्या सेवा देणारे उत्तर महाराष्ट्रातील एसएमबीटी एकमेव हॉस्पिटल आहे.
हृदयविकार व शस्त्रक्रिया, कर्करोग शस्रक्रीया, मूत्रविकार शस्रक्रीया, मेंदू व मणकेविकार शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, किडनी व डायलिसिस, प्लास्टिक सर्जरी, इंटर्वेंशनल रेडियोलॉजी, पोटाचे विकार, अवयव प्रत्यारोपण यासुपरस्पेशालिटी उपचारांसाठी रुग्ण उत्तर महाराष्ट्र किंवा ठाणे पालघर परिसरच नव्हे तर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशीम जिल्ह्यासह मुंबई, गुजरात व मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. समृद्धी महामार्गाने हे रुग्ण अवघ्या काही तासांत रुग्णालय गाठू शकत आहेत.
गेल्या तीन वर्षात सुपर स्पेशालिटी सेवांचा ६९ हजार ७४२ रुग्णांनी लाभ घेतला. त्याखालोखाल आयपीडी म्हणजेच आंतररुग्ण सेवा गेल्या तीन वर्षांत ९ हजार ६५५ इतकी होती. शस्रक्रिया झालेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ९४७ इतका झाला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत (आभा कार्ड), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) धारक रुग्णांची संख्या अधिक होती आणि त्यांच्यावर मोफत उपचार झाले आहेत. जे आजार योजनेत बसू शकले नाहीत अशा रुग्णांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलने अतिशय नाममात्र दरांत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. येथील हृदयविकार विभाग उत्तर महाराष्ट्रातील अतिशय अद्ययावत हृदयविकार विभाग समजला जातो. विविध ठिकाणी मोफत शिबिरं आयोजित केली जातात, शिवाय अनेक क्लिष्ट हृदयविकार शस्रक्रिया याठिकाणी होत आहेत. तसेच लहान मुलांच्या हृदयविकारावर मोठे काम इथे होत असून मोफत दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार आणि रविवारी याठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन केले जाते. हृदयविकाराचे एक स्वतंत्र युनिट सुरु करण्यात आले असून नामवंत हृदयविकार तज्ञांची पूर्णवेळ उपस्थिती याठिकाणी उपलब्ध आहे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या तांत्रिक मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षांपासून एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट कर्करोगावर मोठे काम करत आहे. तब्बल बारा हजारापेक्षा अधिक रुग्णांवर आतापर्यंत उपचार झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत ऑन्कोसर्जरी, तोंडाची सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी तसेच मेडिकल ऑन्कोलॉजी केमोरेपी, इम्युनोथेरेपी, हार्मेानल थेरपी करण्यात येत आहे. तब्बल १० हजारांपेक्षा अधिक कर्करोगग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात यश आले आहेत. ब्लड कॅन्सरवर भारतीय संशोधन असलेल्या इम्म्यूनोअक्ट व एसएमबीटीचा करार झालेला असून कारटी-सेल थेरपी पुढील महिन्यापासून याठिकाणी सुरु होणार आहे.
अतिशय अद्यायवत समजला जाणारा न्युरो मायक्रोस्कोप एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. या मायक्रोस्कोपच्या माध्यमातून मेंदू व मणक्याच्या क्लिष्ट शस्रक्रिया करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या सर्व शस्रक्रिया या योजनेद्वारे मोफत होत आहेत. पूर्णवेळ तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार केले जात आहेत. मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे ,सतत लघवीला येणे, मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे, दाह होणे,लघवीचा रंग गडद असणे, लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे, लघवीचा उग्र वास येणे,महिलांच्या ओटीपोटात दुखणे असे मुत्ररोगावरील प्रत्येक आजारावर उपचार एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. याठिकाणी अनुभवी मूत्रपिंडरोगतज्ञ पूर्णवेळ सेवा देत आहेत.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज किडनी व डायलिसीस विभाग कार्यरत आहे. याठिकाणी योजनेत हे उपचार मोफत होत आहेत. यासोबतच किडनी व यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण सुरु झाल्यामुळे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी न जाता सर्व उपचार याठिकाणी उपलब्ध झाले आहेत. प्लास्टिक सर्जरीदेखील याठिकाणी सुरु असून तज्ञ सर्जन याठिकाणी उपलब्ध आहेत. उत्तर महाराष्ट्रात सांधे प्रत्यारोपणासाठी ठराविक रुग्णालयांना योजनेतून मोफत शस्रक्रिया करण्याची परवानगी करण्यासाठी खूप कमी रुग्णालयांना योजनेतून मोफत करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यात एसएमबीटी हॉस्पिटलचा समावेश असल्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने रुग्णांवर याठिकाणी शस्रक्रिया होत आहेत. यासोबतच टूडी इको, कार्डियाक स्ट्रेस टेस्ट, कलर डॉप्लर, अत्याधुनिक रेडिओलॉजी व पॅथोलॉजी विभागात, डायलिसिस, एमआरआय, सीटी-स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, इसीजी, इईजी, इएमजी, पीएफटी या चाचण्या केल्या जातात.
या शस्रक्रिया अगदी मोफत
हृदयविकार, अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी, जन्मजात हृदयविकार, बलून शस्रक्रिया, ई-पी स्टडी, पेसमेकर, बायपास, वॉल्व्ह दुरुस्ती व बदल, लहान मुलांची ओपन हार्ट सर्जरी, तोंडाचा, जिभेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशय व अंडाशयाचा कर्करोग, जठर व आतड्यांचा कर्करोग, थायरॉईड ग्रंथींचा कर्करोग मूत्राशयाचा कर्करोग, मेंदूतील गाठींची शस्रक्रिया, कवटीचे हाड बसवणे, मणक्यातील नस मोकळे करणे, मणक्यातील नसा व गाठींची शस्रक्रिया, पोटातील क्लिष्ट शस्रक्रिया, लहान-मोठे आतडे, स्वादुपिंड, जठर, अन्ननलिकेच्या दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, प्रोस्तेत ग्रंथींची दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, किडनीस्टोन, मूत्रमार्गातील अडथळे, किडनीची शस्रक्रिया, गुडघा-खुबा सांधे प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे लिगामेंटची शस्रक्रिया व सर्व प्रकारचे फ्रॅक्चर शस्रक्रियापूर्णपणे मोफत केल्या जातात.
२५ विभागांच्या सेवा एकाच छताखाली
एकाच छताखाली २५ वेगवेगळया विभागांच्या स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा देणारे एसएमबीटी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल आहे. विशेष म्हणजे,प्रत्येक विभागात तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध असून येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत.