येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून येवला तालुक्यातील सुरेगाव रास्ते येथे गेल्या ५३ दिवसांपासून उपोषण सुरु आहे.
आज येथे काही कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ व भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन केले. सुरेगाव रास्ते येथील मराठा समाजाने अगोदर निषेध केला. त्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांचा पुतळा जाळला.
छगन भुजबळ आमदार असलेल्या येवला विधानसभा मतदार संघातील सुरेगाव येथे हे आंदोलन झाल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा झाली. याअगोदरही मराठा समाजाचे भुजबळ यांच्या मतदार संघाताली दौ-याच्या वेळी आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला होता.