इंडिया दर्पण डेस्क
तब्बल १७ कोटी ५ लाखाच्या इंजेक्शने १८ महिन्याच्या चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे. अनुवंशिक आजारामुळे हा चिमुकला आजारी होती. त्यासाठी अमेरिकेतून विशेष इंजेक्शन मागवण्यात आले. या इंजक्शेनसाठी आम आदमी पार्टीचे नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर लोकाकंडून पैसे गाळा करुन हे इंजेक्शन मागवण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कनव आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, दिल्लीतील दीड वर्षांच्या कनवला जन्मापासूनच एसएमए नावाचा गंभीर आजार आहे. देशात आतापर्यंत अशी केवळ ९ प्रकरणे आहेत. या मुलाला १७.५ कोटी रुपयांचे इंजेक्शन अमेरिकेतून मिळणार होते.
या लहान मुलाला नवीन जीवन देण्यासाठी आमचे खासदार संजीव अरोरा जी आणि संजय सिंह यांच्या प्रयत्नांमुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे त्याला इंजेक्शन देण्यात आले आणि बाळ अजूनही निरोगी आहे. सुधारणा हळूहळू होत आहे. या उदात्त कार्यात कुटुंबाला मदत करणाऱ्या सर्व सेलिब्रिटी, नेते आणि मीडिया संस्थांचे मनापासून आभार.
दुर्मिळ आणि अनुवांशिक आजारामुळे पीडित नजफगढ येथील कनव नावाचा चिमुकला आजारी होता. अशाप्रकारचा आजार असलेली केवळ ९ बालकेच देशात आहेत. कनवला जन्मापासून अनुवंशिक आजार होता.
17 crore injection saved the life of an 18-month-old baby