शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय महिलांनी रचला इतिहास…क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

डिसेंबर 16, 2023 | 2:21 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
GBc2QcZbAAAz9jt

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या विजयाची हिरो ठरलेल्या दीप्ती शर्मा हिने या सामन्यात एकूण ९ विकेट घेतल्या.

हा सामना जिंकण्यासाठी भारताने इंग्लंडला ४७८ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १३१ धावांवर गारद झाला. एकदिवसीय कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स घेत सामना जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ४२८ धावा केल्या होत्या. भारताकडून शुभा सतीशने ६९, रॉड्रिग्जने ६८ धावा, यास्तिका भाटियाने ६६ आणि दीप्ती शर्माने ६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ १३६ धावाच करू शकला. भारताकडून पहिल्या डावात दीप्ती शर्माने ५.३ षटकात ७ धावा देत ५ बळी घेतले. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने इंग्लंडवर २९२ धावांची मोठी आघाडी घेतली होती. भारताला इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती; पण संघाने तसे केले नाही. यानंतर टीम इंडियाने आपला दुसरा डाव ६ गडी गमावून १८८ धावांवर घोषित केला.

तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला हा सामना जिंकून इतिहास रचायचा होता; पण इंग्लंडला तसे करता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी करत पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २७.३ षटकात केवळ १३१ धावाच करू शकला. भारताकडून दीप्ती शर्माने ४ आणि पूजा वस्त्राकरने दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. महिलांच्या कसोटीत तीनशेहून अधिक धावांचा विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. या संघाने १९९८ मध्ये पाकिस्तानचा ३०९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा हा पहिलाच कसोटी विजय आहे.

पहिल्या डावात नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करताना भारताने ४२८ धावा केल्या होत्या आणि कसोटी इतिहासातील पहिल्या डावातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे, तर कसोटीच्या पहिल्या डावातील ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात, भारताने पहिल्या डावात ४.०९ च्या धावगतीने धावा केल्या आणि महिला कसोटीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखादा संघ ४.०९ पेक्षा जास्त धावगतीने धावा करण्यात यशस्वी झाला.

Congratulations #TeamIndia 🇮🇳

What an epic win in the Test match against England! A true team performance that saw collective effort.

I recall conversations with @ImHarmanpreet and @mandhana_smriti on the value of the truest format for a cricketer and to see the team do well… pic.twitter.com/DjdtZVw7PW

— Jay Shah (@JayShah) December 16, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या स्वदेशी स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची यशस्वी चाचणी….सशस्त्र दल होईल आणखी बळकट

Next Post

येवला तालुक्यात प्रतिकात्मक आंदोलन… भुजबळ, नितेश राणे यांचा पुतळा जाळला

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20231216 WA0194 1 e1702718720534

येवला तालुक्यात प्रतिकात्मक आंदोलन… भुजबळ, नितेश राणे यांचा पुतळा जाळला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011