मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना धमकी देणा-याला ताब्यात घेतले आहे. टाटांना सायरस मिस्त्री करण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाली करून ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून रतन टाटांची सुरक्षा व्यवस्था वाढवा, अन्यथा त्यांचा सायरस मिस्त्री करू, अन्यथा त्यांचा सायरस मिस्त्री होईल, अशी धमकी देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेतला. त्याला चतुर्भुज करण्यात आले. रतन टाटांना धमकी देण्याचा फोन आल्यानंतर नियंत्रण कक्षात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धमकी देणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे उघड झाले.
एका पथकाला रतन टाटा यांच्या सुरक्षेती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धमकी देणाऱ्या कॉलरशी पोलिसांनी संपर्क साधला; पण कॉलरचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीने कॉलरचा शोध घेतला. त्याचे लोकेशन कर्नाटकात आणि तो पुण्याचा रहिवासी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील घरी धाव घेतली. धमकीचा फोन करणारी व्यक्ती पाच दिवसांपासून बेपत्ता होती. हा मनोरुग्ण आहे. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. त्याने फायनान्समध्ये एमबीए केले असून अभियांत्रिकीचेही शिक्षण घेतले आहे.