मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आ. आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आदित्य यांची चौकशी होणार असताना शर्मिला राज ठाकरे यांनी, आदित्य असे काही करेल असे मला तरी वाटत नाही असे सांगत पाठराखण केली आहे.
नागपूरमध्ये येथे सुरू असलेल्या अधिवेशनात दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरूनन ठाकरे कुटुंबाला कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. सरकारने नेमलेल्या एसआयटीत अपर पोलिस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारती हे एसआयटीवर लक्ष ठेवणार आहेत.
राज ठाकरे यांच्या पत्नी असलेसल्या शर्मिला यांनी आदित्य यांच्यावर विष्वास व्यक्त केला. उद्योग कर उद्योग कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. माध्यमांनी आदित्यबद्दल शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारले, त्यावर त्या म्हणाल्या, चौकशा तर कुणीही लावेल. आम्हीही या प्रकारातून गेलो आहोत. पण आदित्य असे काही करेल असे मला वाटत नाही.