नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विरोधात दावा दाखल केल्याने तिघांनी बहिण भावास मारहाण केल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्राहक न्यायालय परिसरात घडली. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने भाऊ जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज हिरामण टिळे, उध्दव नानासाहेब टिळे व हिरामण टिळे (रा.तिघे बाभळेश्वर ता.जि.नाशिक) अशी बहिण भावास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सुधाकर मुरलीधर ढिकले (५५ रा.सय्यद पिंपरी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. ढिकले गुरूवारी (दि.१४) आपल्या बहिणी समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
ग्राहक न्यायालय आवारात संशयितांनी दोघा बहिण भावास गाठून ही हाणामारीत केली. संतप्त संशयितांनी ढिकले यांच्या चुलत बहिणीने दावा दाखल केल्याची कुरापत काढून शिवीगाळ व दमदाटी करीत दोघा बहिण भावास मारहाण केली. या घटनेत दगड फेकून मारण्यात आल्याने ढिकले जखमी झाले असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.